शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 मे 2018 (09:06 IST)

औरंगाबादमध्ये तणाव, दगडफेकीत २५ जण जखमी

औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला. शहरातील काही भागांमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवल्याचे समजते.  दगडफेकीत २५ जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 

समाजकंटकांनी दुकाने तसेच वाहनांची जाळपोळ केली. जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत स्थानिक तसेच काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. एकूण २५ जण या दगडफेकीत जखमी झाल्याचे वृत्त आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.