Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल नार्वेकरांचा 'तो' निकाल ठरणार डोकेदुखी?

Updated: मंगळवार, 23 जानेवारी 2024 (09:04 IST)
 
शिंदे यांनी नियुक्त केलेल्या व्हिपलाही राहुल नार्वेकर यांनी अधिकृत व्हिप म्हणून मान्यता दिली. शिवसेना पक्षाचे आणि शिंदे गटाच्या आमदारांनी व्हीपचे कोणतेही उल्लंघन केले नसल्याचे त्यांनी सांगितले. या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
 
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवरील अपात्रतेची याचिका फेटाळण्याच्या राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील इतर आमदारांना नोटीस बजावली.
 
शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) आमदारांना दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवण्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नकार दिला होता. यावर शिवसेना उद्धव ठाकरे दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार २२ जानेवारी) नोटीस बजावली आहे.
 
भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी झाली.  दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे शिंदे गटाला सांगण्यात आले आहेत.  
 
उद्धव ठाकरे यांच्याबाजून आज वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन होत आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
 
सुप्रीम कोर्टाने सुनावणी करावी की कलम 226 अंतर्गत हायकोर्टाने?, असे मुख्य न्यायाधीशांनी विचारले असता. हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठविल्यास निकालाला विलंब होण्याची भीती सिब्बल यांनी व्यक्त केली.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

छत्रपति संभाजीनगर मध्ये वाळूने भरलेल्या ट्रकखाली चिरडून ८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गडचिरोलीत आदिवासी विकास संघटनेचे आंदोलन

मंत्रालयात दीर्घ काळापासून प्रतिनियुक्तीवर असलेल्या ३१४ कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई

LIVE: मंत्री अशोक उइके यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गडचिरोलीत आंदोलन

महाराष्ट्रातील सर्व स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये मराठी भाषा विभाग स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले

पुढील लेख
Show comments