1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (14:39 IST)

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणूकीचे बिगुल वाजले

krishi bajar samiti nashik
गेल्या अनेक महिने पुढे ढकलेल्या गेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांचे बिगुल अखेर वाजले असून नाशिक जिल्हयातील नाशिक, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, मनमाड, मालेगाव, येवला, देवळा, दिंडोरीसह १४ बाजार समिती मध्ये पुढील महिन्याच्या अखेर निवडणूका होणार आहे. यासाठी निवडणूकीचा कार्यक्रम जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केला असून काल प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. प्रसिध्द झालेल्या याद्यांवर २३ नोव्हेंबर पर्यंत हरकती नोंदविता येणार आहे,तर २४ नोव्हेबर ते २ डिसेंबर या काळात हरकतींवर निर्णय दिला जाणार आहे. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी अंतिम याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहे. या निवडणुकांमुळे बाजार समितीच्या इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरु झाली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor