suvichar

राज्यातील पहिली लिंग बदल ओपीडी मुंबईत सुरु

शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (15:49 IST)
मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने बीडचे पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर केलेल्या यशस्वी लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर, याच ठिकाणी पूर्ण वेळ लिंग बदल करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांकरिता स्वतंत्र ओपीडी विभाग सुरू केला आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच विभाग ठरला असून रुग्णालयाने यासोबतच इंटरसेक्स वॉर्डही सुरू केलाय. ओपीडी व वॉर्डाचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले आहे. बीडच्या साळवे यांचा मोठा सहभाग आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना जेव्हा येथे लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आले होते तेव्हा त्यांना कुठल्या वॉर्डात ठेवायचे याबाबत रुग्णालय प्रशासनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना त्यावेळी अतिविशिष्ट व्यक्तींच्या सूटमध्ये ठेवण्यात आले होते. वैद्यकीय अधिक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले की लिंगबदलाकरिता आमच्याकडे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयाने इंटर सेक्स वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याप्रकारचा उपक्रम राबवणारे हे पहिलेच रुग्णालय असणार आहे. रुग्णालयाकडे आतापर्यंत १३ रुग्णांनी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेबाबत विचारणा केली आहे. 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

दिल्लीतील साकेतमध्ये पाच मजली इमारत कोसळली; बचाव कार्य सुरु

शार्दुल ठाकूर मुंबईच्या टी२० लीगची धुरा सांभाळणार, संघाने त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली

महायुती सरकार २५ जूनपासून महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी राज्यव्यापी अभियान सुरू करणार

"देणगी द्या नाहीतर मंत्रीपदाचा राजीनामा द्या!" पार्थ पवार यांच्या अल्टिमेटममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

LIVE: "देणगी द्या नाहीतर मंत्रिपदाचा राजीनामा द्या!" पार्थ पवार यांच्या अल्टिमेटममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

पुढील लेख