मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

पर्यटन अंतराळातील

विमान वातावरणार्पंत जाते. वातावरणाच्या पलीकडे जायचे माणसाचे स्वप्न 4 ऑक्टोबर 1957 रोजी साकार झाले. रशियाने पहिला कृत्रिम उपग्रह 'स्पुटनिक' अंतराळात यशस्वीरीत्या पाठवून अंतराळ युगाचा प्रारंभ केला.
 
'स्पुटनिक' रशियन शब्दाचा अर्थ आहे प्रवासी. या छोट्या उपक्राच्या यशामुळे विज्ञान क्षेत्रात एक नवीन दालन उघडले गेले. या पहिल्या कृत्रिम उपग्रहाला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करणसाठी 96.2 मिनिटे लागली. त्यानंतर माणसाला अंतराळात पाठवून परत पृथ्वीवर आणण्याचे स्वप्न साकार झाले. 12 एप्रिल 1961 रोजी पहिला अंतराळवीर ' युरी गागरीन' याने यशस्वी अंतराळ सफर केली. 16 जून 1963 रोजी रशियाच्या व्हॅलेंटिना तेरेश्र्कोवा या महिलेने पहिली महिला अंतराळवीर होण्याचा मान  पटकावला. त्यानंतर पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र हे लक्ष्य ठरले. 
 
20 जुलै 1969 रोजी अेरिकेच्या 'नील ऑर्मस्ट्राँग'ने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. त्यानंतर स्पेस शटलचे युग आहे. अंतराळ भ्रमणाचा आनंद घेतला जात होता. नवनवीन संशोधन केले जात होते. या सर्व उपक्रमात ज्या-ज्या अंतराळवीरांनी भाग घेतला त्यांना प्रथम प्रशिक्षण दिले जात असे. अनेक प्रशिक्षित अंतराळवीरांनी भ्रमण केले. त्यांना बरचवेळा यश आले. परंतु काहीवेळा अपयश आले.
 
28 जानेवारी 1986 हा दिवस अशाच एका मोठ्या अपयशाचा! चॅलेंजर या स्पेस शटलचा उड्डाणानंतर  73 सेकंदानी स्फोट झाला. त्यातील सातही अवकाशवीर ठार झाले. 1 फेब्रुवारी 2003 रोजी झालेल्या   कोलंबिया स्पेस शटलच्या अपघातात भारतीय वंशाची कल्पना चावला हिचा मृत्यू झाला. 
 
आतार्पंतच्या झालेल्या चुका शोधल्या जातील आणि दूरवरचे अंतराळ पर्यटन लवकरच सुरू होऊ शकेल, असा विश्वास पर्यटकांना वाटत आहे. या महागड्या परंतु रोमांचक अंतराळ प्रवासाचे स्वप्न हे पर्यटक   उराशी बाळगून आहेत.