Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीजनिर्मिती केंद्र उरणच्या बॉयलर स्फोटातील तिसऱ्या कामगाराचा मृत्यू

Updated: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (21:25 IST)
 
या वायू विद्युत केंद्राच्या दुर्घटनेतील एका सहाय्यक अभियंत्यासह तीन कामगारांना त्यांचा काहीही दोष नसतांना जीवाला मुकावे लागले आहे.सोमवारी १० ऑक्टोबरच्या रात्री कामगार विष्णू पाटील यांचा मृतदेह वायू विद्युत निर्मिती केंद्राच्या प्रवेशद्वाजवळ आणण्यात आला होता. व्यस्थापणाने मूत कामगारांच्या वारसांच्या भविष्यासाठी त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळावा या मागणीसाठी प्रयत्न केले. मात्र निर्धास्त असलेल्या प्रशासन अधिकाऱ्यांनी मृत कामगारांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्या ऐवजी सरकारी नियमांचे पाढे वाचण्याशिवाय विशेष काही मदत देण्यावर भर दिलाच नाही.एकंदरीत प्रकल्पातील दुर्घटना ही हलगर्जीपणातून झाली असल्याचे स्पष्ट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
 
अशा अनेक त्रुटीवर आधारित हा प्रकल्प कार्यरत आहे. असे अनेक गौप्यस्फोट केल्याने कालच्या बॉयलरच्या स्पोटापेक्षा त्यांनी केलेला गौप्यस्फोट जबरदस्त होता. याच प्रत्यय प्रकल्पात अनेकवेळा आल्याचेही त्यांनी कबुल केले आहे.उरण तालुक्यात ओएनजीसी, बीपीसीएल,जेएनपीए, धुतुम परिसरात अशाच अतिज्वलनशील रसायनांचा, खनिज तेलाचा, डीझेल, नाफ्ताचा, एलपीजीचा, खाद्य तेलाचा साठा साठविण्याची सोय येथील प्रचंड टाक्यांमध्ये आहे. हजारो मेट्रिक टनाच्या हिशेबात या ज्वलनशील पदार्थाची उलाढाल दैनंदिन होत असते.ती हाताळतांना सर्वप्रथम कामगाराच्या सुरक्षते विषयी नेमके कोणते धोरण अमलात आणले गेले याबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने कंपनी काही ठोस पावले उचलते का? कामगारांना कंपनीत सुरक्षा जँकीटे दिलेली आहेत का? हे तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.त्याच बरोबरीने कंपनीच्या आतील अग्निशमन साधने, स्वंयचलीत यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत आहेत का ? याचीही वेळोवेळी दक्षता घेणे गरजेचे आहे.

काही वर्षा पूर्वी राज्य वीज निर्मिती गॅस टर्बाइनच्या याच प्रकल्पात रात्रीच्या वेळी अशाच प्रकारे बॉयलरचा स्पोट झाला होता व त्यावेळी येथिल प्रचंड मोठी विद्युत मोटार २५ फुटापेकक्षाही लांब उडाली होती. तर अशाच प्रकारचा हादरा २५ ऑक्टोबर २००८ रोजी शॉर्टसर्किटमुळे उडालेल्या स्पार्किंगमुळे घडला होता. या मध्ये तीन कर्मचारी होरपळले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. आत्ता बॉयलर स्फोटात तीनही कामगारांचा मृत्यू झाला आहे
Edited By - Ratandeep Ranshoor

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील १२४ नवीन आरोग्य सुविधांचे ऑनलाइन उद्घाटन केले

वाराणसी विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने पिस्तूलने गोळीबार, २ कर्मचारी जखमी

राज्य सरकारने एमएमआरडीएसाठी १२१ कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली

LIVE: महाराष्ट्रात १२४ नवीन आरोग्य संस्थांचे उद्घाटन

नवीन एअर इंडिया इमारतीवर १०६ शहीदांची नावे दिसणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मंजुरी

पुढील लेख
Show comments