शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2022 (14:47 IST)

धुळ्यात गर्लफ्रेंडला 70 तुकडे करण्याची धमकी

महाराष्ट्रातील धुळे शहरात लिव्ह इन पार्टनरने तरुणीला 70 तुकडे करण्याची धमकी दिली आहे. तरुणाने प्रेयसीला धमकावून श्रद्धा वॉकरसारखी अवस्था करेन अशी धमकी दिली आहे. धुळे येथील रहिवासी असलेल्या पीडित महिलेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. तरुणीने आपल्यावर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले असून, तरुणाने तिचे 70 तुकडे करण्याची धमकीही दिली आहे. 
 
तरुणीने सांगितले की तिच्या साथीदाराने तिला धमकी दिली की, दिल्लीत श्रद्धा वॉकरचे 35 तुकडे केले, जर तू विरोधात गेलीस तर तुझे 70 तुकडे करीन.
 
तरुणीने बुधवारी रात्री पोलिसांत तक्रार दाखल केली. यामध्ये तिने अर्शद सलीम मलिक नावाचा तरुण त्याच्यासोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत असल्याचे म्हटले आहे. तिने सांगितले की तो तिला खूप टॉर्चर करतो. आणि जेव्हा तिने कोणत्या गोष्टीला समंती नसल्याचे दर्शवले तर अर्शदने तिला 70 तुकडे करेन अशी धमकी दिली. 29 नोव्हेंबर रोजी त्याने धमकी दिली. जुलै 2021 पासून ते एकत्र राहत असल्याचे मुलीने सांगितले.