शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (08:18 IST)

कोणी काही बोलत असतील पाच कोटी घेतले तर ते मोजायला गेले होते का माहित नाही? गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर

Gulabrao Patil
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले होते. तसेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकासा आघाडी सरकारही कोसळले होते. दरम्यान, या बंडखोर आमदारांना ५० खोके देण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून नेहमी होत असतो. त्यातच आता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही शिंदे गटातील आमदारांना आणखी पाच पाच कोटी रुपये दिले गेल्याचा सनसनाटी आरोप केला. त्यांच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर देत टोला लगावला.
 
“ज्यावेळी सत्तांतर झालं तेव्हाच सांगितलं होतं की जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार येईल तेव्हा देवीचं दर्शन घ्यायला जाऊ. या अर्थानं सर्व जण दर्शन घ्यायला गेले होते. कोणी काही बोलत असतील पाच कोटी घेतले तर ते मोजायला गेले होते का माहित नाही?” असं म्हणत गुलाबराव पाटलांनी चंद्रकांत खैरेना टोला लगावला. निश्चितपणे माणूस ज्या देवावर श्रद्धा ठेवतो ती पूर्ण करतो ही आपली पद्धत आहे. त्यामुळे सर्व गेल्याचे पाटील म्हणाले.
 
काय म्हणाले होते खैरे?
“इकडे या गद्दार आमदारांना ५० खोके मिळाले होते. त्यानंतर आता गुवाहाटीमध्ये गेल्यावर प्रत्येकी पाच पाच खोके आणखी मिळाले. एका उद्योगपतीने मला ही खात्रिलायक माहिती दिली आहे,” असे खैरे म्हणाले.
Edited by: Ratnadeep Ranshoor