सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2019 (16:17 IST)

तर तुमची मुंबईतील कार्यालय बंद पाडू : उद्धव ठाकरे

बँक आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक सुरु केली आहे .तुम्ही शेतकर्‍याला नडाल तर तुमची मुंबईतील कार्यालय बंद पाडून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांना दिला आहे. उद्धव ठाकरे आज नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमधील लासूर येथे पीक विमा केंद्रांना त्यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते.
 
पीक विमा योजनेत जो घोळ झालाय तो आता हळूहळू समोर येत आहे. विमा कंपन्यांच्या एजंटनी शेतकऱ्यांना लुटलं आहे. समोरच्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही उत्तर देणार. तुमची ऑफिसेस मुंबईत आहे, शेतकऱ्याला नडाल तर तुमची दुकाने बंद करून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांना दिला.