संबंधित माहिती
- उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा : राम मंदिर मुद्द्यावरून शिवसेना भाजपवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे?
- 'सामना'तून पाकिस्तानवर टीका
- महिलांना यापुढे मेट्रो आणि सरकारी बसमध्ये मोफत प्रवास या सरकारची मोठी घोषणा
- शिवसेनेचा केंद्रावर पुन्हा वार बेरोजगारीसाठी गांधी-नेहरू यांना आता दोषी धरू नका
- मुख्यमंत्र्यांच्या काकू म्हणतात, झाडे विधर्भात नको मराठवाड्यात लावा, वनमंत्री मुनगंटीवार यांच्यावर निशाणा
उद्धव ठाकरे १६ जूनला अयोध्येत
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे १६ जून रोजी अयोध्येत जाणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदारही असणार आहेत. अयोध्येतील रामलल्ला मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार हे आधीच ठरलं होतं. मात्र त्या दौऱ्याची तारीख समोर आली नव्हती. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. १६ जून रोजी ते अयोध्येत जातील आणि राम मंदिर निर्मितीचा आढावा घेतील असेही समजते आहे.
याआधी २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब अयोध्येत भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचेही दर्शन घेतले होते.
