सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 3 जून 2019 (17:15 IST)

महिलांना यापुढे मेट्रो आणि सरकारी बसमध्ये मोफत प्रवास या सरकारची मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकांमध्ये जबरदस्त पराभव झालेल्या दिल्ली येथील आम आदमी पार्टी च्या राज्य सरकारने येत्या विधानसभा निवडणुका समोर ठेवत फार मोठी   महत्वाची घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये महिलांना यापुढे मेट्रो, सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. ही अशी घोषणा दिल्ली सरकारतर्फे करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. राजधानी दिल्ली येथे महिलांना असुरक्षित वाटत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने महिलांसाठी दोन महत्वाचे निर्णय घेतल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. यापुढे आता महिलावर्गाला दिल्ली मेट्रो, दिल्ली परिवहन मंडळाच्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. 
 
अनेकवेळा सार्वजनिक वाहनांच्या तिकिटाचा दर अधिक  असल्याने महिला खासगी वाहनांचा पर्याय निवडतात. त्यामुळे सार्वजनिक वाहनांमधून महिलांना प्रवास करणे सोपे जावे हा या मागील उद्देश आहे असे केजरीवाल यांनी सांगितले. तसेच ज्या महिला आर्थिक सक्षम आहेत तिकीट विकत घेऊन प्रवास करू शकणार आहेत. श्रीमंत महिलांनी सरकारी सबसिडीचा वापर करू नये यासाठीही त्यांना प्रोत्साहित केले जाईल असे त्यांनी सांगितले. ही सेवा येत्या दोन ते तीन महिन्यात  सुरू होणार आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉरपोरेशन यासाठी सहाय्य करणार असल्याचेही केजरीवाल यांनी यावेळी सांगितले आहे.