शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (17:19 IST)

इतिहासाच्या पुस्तकातील उल्लेख तपासून पाहण्याचे आदेश देणार - विनोद तावडे

राज्य माध्यमिक मंडळाच्या नववीच्या इतिहासाच्या पुस्तकातील माजी प्रधानमंत्री राजीव गांधी तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांच्याविषयी प्रकाशित झालेला मजकूर तसेच त्यातील विशिष्ट उल्लेखांची आवश्यकता तपासून पाहावी यासाठी अभ्यास मंडळाला आदेश देण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. तावडे पुढे म्हणाले, इतिहासाच्या पुस्तकांमध्ये केवळ स्वातंत्र्यपूर्व घडामोडींचाच नव्हे तर नवीन इतिहासाचाही समावेश असावा. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यानंतरच्या नेत्यांची ओळख व्हावी यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्यात आले. यात कोणताही राजकीय उद्देश नव्हता. हे बदल करण्यासाठी  इतिहासाचे अभ्यासक सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने सन 2000 पर्यंतच्या इतिहासाचा समावेश पाठ्यपुस्तकात केला. अनेक उल्लेखनीय व महत्त्वाच्या घटनांचा चांगला उल्लेख या पुस्तकात आला आहे. मात्र राजीव गांधी यांच्या संदर्भात आलेला बोफोर्स तोफ खरेदीचा विषय आणि इंदिरा गांधी यांचा आणीबाणीच्या काळातील संदर्भ अनावश्यक असल्याची भावना सभागृहाची झाली असल्याने तसे अभ्यास मंडळाला कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.