Marathi Biodata Maker
✕

Navneet Rana जाणून घ्या कोण आहेत चित्रपटातून राजकारणाकडे वळलेल्या खासदार नवनीत कौर राणा

Updated: सोमवार, 25 एप्रिल 2022 (15:26 IST)
 
नवनीत कौर राणा यांचा जन्म मुंबईत पंजाबी कुटुंबात झाला. नवनीतचे वडील आर्मी ऑफिसर होते. मुंबईतील कार्तिक हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.
 
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नवनीतने मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला आणि जवळपास 6 म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले.
 
त्यानंतर त्या मोठ्या पडद्याकडे म्हणजेच चित्रपटांकडे वळल्या. प्रतिभावान असल्यामुळे त्यांनी हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि पंजाबी अशा अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आणि चाहत्यांनी त्यांच्या कामाचे खूप कौतुक केले.
 
यानंतर 3 फेब्रुवारी 2011 रोजी नवनीतने रवी राणासोबत लग्न केले. दोघांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. सध्या हे दोघेही एक मुलगी आणि एका मुलाचे आई-वडील आहेत.
 
त्यानंतर चित्रपट सोडून नवनीत राणा यांनी राजकारणाच्या दुनियेत पाऊल ठेवले. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांना विजय मिळवता आला नाही.
 
त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ज्यात त्यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते आनंद अडसूळ यांचा पराभव करून लोकसभा निवडणूक जिंकली.
 
तिकडे रवी राणांबद्दल बोलायचे तर ते महाराष्ट्रातील विदर्भातील बडनेरा येथून तीन वेळा अपक्ष आमदार झाले आहेत. याशिवाय ते युवा स्वाभिमान नावाचा पक्षही चालवतात. रवी राणा हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही जवळचे असल्याचे बोलले जाते.
 
नवनीत राणा वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्या जातीवरून चर्चेत आल्या आहेत. खरे तर शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी बनावट प्रमाणपत्र बनवून लोकसभा निवडणूक लढवल्याचा आरोप केला होता.
 
ज्यावर मुंबई उच्च न्यायालयाने जून 2021 मध्ये त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आणि त्यांना दोन लाखांचा दंड ठोठावला. मात्र, नंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

MPSC पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण! रोहित पवारांनी तुकाराम मुंडें कडे सुपूर्द केले महत्त्वाचे पुरावे

दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत! तपासावर न्यायालयीन देखरेखीची मागणी; १८ नोव्हेंबरला सुनावणी

शेतकऱ्यांच्या छळावर उपमुख्यमंत्री शिंदे आक्रमक! शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास सावकारावर खुनाचा गुन्हा दाखल करणार

LIVE: शेतकऱ्यांच्या छळावर उपमुख्यमंत्री शिंदे आक्रमक

महाराष्ट्र एफडीएने पतंजली तुपासह ९ कोटी रुपयांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त केले

पुढील लेख
Show comments