1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 एप्रिल 2022 (13:28 IST)

अमरावतीच्या कांडलीत गॅस सिलिंडरच्या गोदामाला आग लागली

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर जवळील कांडली गावात गॅस सिलिंडरच्या गोदामाला भीषण आग लागली . ही आग आज सकाळी लागली. आगीमुळे आतापर्यंत 10 ते 11 सिलिंडरचा स्फोट झाला आहे. कांडली गावातच एका गॅस एजन्सीच्या गोदामाला ही आग लागली. या भीषण आगीच्या लाटा  दूरवर पसरल्या. सिलिंडरच्या स्फोटाचा आवाज दोन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. सकाळी आठच्या सुमारास स्फोटाचा पहिला आवाज ऐकू आला. दरम्यान, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भीषण आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या घटनेचे व्हिडीओ मध्ये आगीचे लोळ दुरूवर दिसत आहे. आगीमुळे झालेल्या स्फोटाचा आवाज दोन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील कांदळी ग्रामपंचायतीत एचपी गॅस एजन्सीचे गोदाम आहे. आज सकाळी आठ वाजता याच गोदामाला आग लागली आणि बघता बघता एकापाठोपाठ एक सिलिंडरचा स्फोट झाला. आगीची माहिती मिळताच अचलपूर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे.सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.