1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (21:59 IST)

नारायण राणे यांचा इशारा म्हणाले राणाला बाहेर काढणार, बघुया कोण येतं तिकडे, मर्द आहेत ना या तिकडे

narayan rane
पोलिसांनी हस्तक्षेप करुन राणा कुटुंबिय घराबाहेर पडणार असतील तर त्यांना जाऊ द्या, जर त्यांना अडवलं,  जायला दिलं नाही तर मी स्वत: जाणार राणाच्या घरी, राणाला बाहेर काढणार, बघुया कोण येतं तिकडे, मर्द आहेत ना या तिकडे असं आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलं आहे.  त्या अगोदर पोलिसांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढावं असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 
 
महाराष्ट्रात सरकार आहे असं काही वाटत नाही, आणि सरकारी पक्षच महाराष्ट्रातलं मुख्यत मुंबईत वातावरण बिघडू पाहतायत, शिवसेनेच्या नेत्यांची भाषणं किंवा पत्रकार परिषद ऐकल्यानंतर या सर्वांना संजय राऊत, परब यांना मुख्यमंत्री आपल्या पक्षाचं आहे की  नाही याचं भान आहे का हा प्रश्न आहे अशी टीका राणे यांनी केली.
 
सत्ता असतानाही ते आव्हान देतायत, संजय राऊत तर स्मशानात व्यवस्था करुन ठेवा आम्हाला धमक्या दिल्या तर, परब म्हणतायत जो पर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत राणा दाम्पत्याला आम्ही जाऊ देणार नाही,  या सर्व धमक्या पाहात असताना राज्यात पोलीस व्यवस्था आहे की नाही हा प्रश्न आहे, असं राणे यांनी म्हटलं आहे.
 
स्मशानात पाठवण्याची भाषा करणं गुन्हा नाही का, माफी नाही मागितली तर आम्ही घरातून बाहेर पडू देणार नाही, हा गुन्हा नाही का. काय करतायत पोलीस असा सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे.