शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (16:29 IST)

Rana vs Shivsena : शिवसेना आजीची पुष्पा स्टाईल

shiv sena aaji
राणा दाम्पत्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचे समजल्यापासून शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शनिवारी (दि. 23 एप्रिल) सकाळपासूनच मातोश्री बाहेरही तसेच नवनीत राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये एक 92 वर्षांच्या आजीही सहभागी झाल्या होत्या. राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करताना आजीबाईंनी थेट ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये “झुकेगा नहीं साला” म्हणत इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, आम्ही शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे आहोत. आम्हाला कोणीही हिंदुत्व शिकवू नये. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी त्यांना फोन करुन घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना घरी जाऊन आराम करण्याचा सल्ला दिला.
 
 राणा यांच्या दाव्यानंतर लगेचच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली, त्यानंतर मातोश्री आणि राणा यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली.