शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 23 एप्रिल 2022 (15:31 IST)

म्हणून राणा दाम्पत्याची माघार घेतली आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केला होता. पण आता मातोश्रीवर जाण्याच्या निर्णयावरुन राणा दाम्पत्याची माघार घेतली आहे. 
 
मातोश्री बाहेर आणि राणा दाम्पत्यच्या घराबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या दिला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी राणा दाम्पत्याला घरातच रोखून ठेवलं होतं.
आता माघार घेणार असल्याचं आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं.


उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत दौरा आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी माघार घेत असल्याचं आमदीर रवी राणा यांनी म्हटलं आहे.