रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (15:26 IST)

आम्ही काय चुकीचं बोलतोय?न्याय सगळ्यांना सारखाच हवा : संदीप देशपांडे

sandeep deshpande
मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला आहे. शिवसैनिक आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरले आहेत. याचा धागा पकड मनसेकडून शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे.
 
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ट्विट करत टिका केली आहे. तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको म्हणून तुमचा विरोध आहे. हजारो लोक रस्त्यावर जमवलीत काही हरकत नाही. आम्हाला पण आमच्या घरासमोर भोंगा नकोय. आम्ही काय चुकीचं बोलतोय?न्याय सगळ्यांना सारखाच हवा. बरोबर ना मुख्यमंत्री साहेब??? असा निशाणा संदीप देशपांडे यांनी साधला आहे. तसेच शिवसेना पूर्णपणे ट्रॅप मध्ये फसत चालली आहे,एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहेत असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.