1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (14:25 IST)

राज्यात या जिल्ह्यात वादळांसह गारांचा पाऊस

Hail along with storms in this district in the state राज्यात या जिल्ह्यात वादळांसह गारांचा पाऊस
राज्यात कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गारांसह पावसानं जोरदार हाजिरी लावली. लांजा , रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण ,गुहागर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळला. या पावसाच्या जोरदार आगमनानं नागरिकांची धांदल झाली. चिपळूण गुहागर, संगमेश्वर, या ठिकाणी गारांसह पाऊस झाला. सुसाट्याचा वारा सुरु असल्याने झाडे उन्मळून पडली. वीज पुरवठा खंडित झाला. अचानक गारांसह आलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेले होते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सुसाट वाऱ्याने काही झाडे उन्मळून विजेच्या वाहिन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्यात कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. येत्या पुढील 4 दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.