शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (11:22 IST)

शिवसेना मंत्र्याच्या पीएवर गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न

सध्या राज्यात राजकारण तापलं आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात खळबळ उडणारी घटना घडल्याचे वृत्त मिळत आहे. शिवसेनेच्या मंत्राच्या पीए वर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. राजकीय वैमनस्यातून ही  घटना घडली असल्याचे वृत्त आहे. राजळे रात्रीच्या वेळी आपल्या गाडीने घराकडे जात असताना पाच लोकांच्या टोळक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. 
 
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10  वाजेच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात राहुल राजळे यांना गोळी लागली असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक केली नसून पोलिस प्रकरणाचा तपास करत आहे.