शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सासवड , शनिवार, 23 एप्रिल 2022 (16:13 IST)

झाड कोसळून नवविवाहितांचा मृत्यू

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार काल शुक्रवारी राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी.अशातच अर्धवट जळलेले वडाचे झाड अंगावर कोसळल्याने नवविवाहित जोडप्यासह सात वर्षीय त्यांच्या भाचीचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुरंदर तालुक्यातील सासवड वीर रस्त्यादरम्यान, घडलीय. रेनुकेश गुणशेखर जाधव (वय- 29) पत्नी सारिका रेनुकेश जाधव (वय- 23) त्याच बरोबर त्यांची भाची ईश्वरी संदेश देशमुख (वय-7) अशी झाड अंगावर पडून मृत्यू झालेल्याची नावे आहेत.
 
रेणुकेश आरि सारिका यांचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. या दुर्देवी घटनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत त्यांची भाजी गंभीर जखमी झाली पण उपचारादरम्यान ईश्वरीचा देखील मृत्यू झाला.