Dharma Sangrah
✕

राष्ट्रवादी काँगेस आणि शिवसेनेत फूट का पडली? यावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Updated: सोमवार, 18 मार्च 2024 (09:10 IST)
 
यासाठी त्यांनी आपली मूळ विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेला स्वीकारलं. त्यामुळं त्यांच्या पक्षात फूट पडली”, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. “काँग्रेस न होती तो क्या होता”, या पुस्तकाचे प्रकाशन आज फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर भाष्य केलं.
 
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष तयार झाले. या पक्षांनी काँग्रेसच्या राजकारणाची शैली स्वीकारली. काँग्रेसने घराणेशाही आणि पैशांच्या जोरावर राजकारण करण्याचा पायंडा पाडला. मात्र भाजपा हा एकमेव पक्ष होता, ज्याने काँग्रेसच्या विचारधारेला, त्यांच्या राजकारणाच्या शैलीला नाकारले आणि स्वतंत्र शैली विकसित केली.
 
“घराणेशाहीच्या राजकारणाचे कंबरडे मोडण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलं. केवळ पुढाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहे म्हणून यापुढे कुणीही राजकारणात दिसणार नाही. ज्याच्यात क्षमता आहे, तो स्वतःच्या हिंमतीवर पुढे जाईल, अशाप्रकारच्या राजकारणाच्या दिशेने आम्ही चाललो आहोत”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
 
“भाजपाने घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला असला तरी कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखलेले नाही. जर राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात यायचं असेल तर त्यांनी जरूर यावं. पण स्वतःच्या ताकदीवर यावं. राजकारणाला स्वतःचा हक्क समजून येऊ नये. जे लोक योग्य आहेत, त्यांना डावलून जेव्हा फक्त आपल्या कुटुंबातील लोकांवरच लक्ष केंद्रीत केलं जातं, त्याला घराणेशाहीचं राजकारण म्हणतात.
 
काँग्रेसमध्ये नेहरूंच्या घराण्यातील व्यक्तीकडेच नेता म्हणून पाहिलं जातं. आज मल्लिकार्जुन खरगे भलेही काँग्रेसचे अध्यक्ष असतील पण त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हे सर्वांना माहीत आहे”, असंही ते म्हणाले.
Edited By - Ratnadeep Ranshoor 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी ठेवण्याची तयारी सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले....

UPI services closed देशात उद्या बंद राहणार यूपीआय सेवा

LIVE: दादर स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी करण्याची प्रक्रिया आगामी विधानसभा अधिवेशनात पूर्ण होणार

ऍपलच्या अनेक सेवा का बंद पडल्या? या तांत्रिक बिघाडांमागे सायबर हल्ला हे कारण आहे का? कंपनीने काय सांगितले?

न्यूझीलंड मालिकेनंतर अर्शदीप सिंगची आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेत अव्वल २० मध्ये प्रवेश

पुढील लेख
Show comments