Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाळ्यानंतर रस्त्यांच्या कामाचे नियोजन करणार : मनपा आयुक्त

Updated: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (08:16 IST)
 
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी उपस्थित होते. पुढे बोलतांना आयुक्त कुलकर्णी म्हणाले की, शहरात अमृत व भुयारी गटारी या दोन मोठ्या शासकीय योजनांचे काम सुरु असल्याने संपुर्ण शहरातील रस्ते खोदण्यात आले आहे. मात्र ज्याठिकाणी दोन्ही योजनांचे कामाची चाचणी घेवून ते पुर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याठिकाणावरील रस्ते दुरुस्तीचे काम केले जात आहे. या दोन्ही योजनांचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे काम पुर्ण होणार आहे. त्यापुर्वी जिल्हा नियोजन समिती, शंभर कोटीसह महापालिकेला मिळेल तो निधी एकत्रीत करुन शहरातील रस्त्यांच्या कामाचे नियोजन केले जाणार असल्याचे आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी सांगितले.
 
शहरात राजकीयसह अनेक संस्थांकडून विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावले जात आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत बॅनर लावणार्‍यांवर शनिवार पासून कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी सांगितले.
 
महापालिका प्रशासनाकडून शहरात अनधिकृत बॅनर लावणार्‍यांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. तसेच अधिकार्‍यांनी तक्रार दिल्यानंतर बॅनरवरील शुभेच्छकांसह ते लावणार्‍यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. त्यामुळे अनधिकृत बॅनर लावणार्‍यांनी मनपा प्रशासनाची परवानगी घेवूनच बॅनर लावण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी पोर्टलवर २९ नवीन योजना समाविष्ट केल्या

लेक लाडकी योजनेअंतर्गत आता बँक तपशील न देता रुपये DBT द्वारे थेट तुमच्या खात्यात हस्तांतरित होणार

भारतीय हॉकी संघाने वेल्सविरुद्ध पूल डी मधील पहिला सामना ३-१ ने जिंकला

LIVE: 'महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी पोर्टलवर २९ नवीन योजना समाविष्ट केल्या

महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य, १८ ऑगस्टपासून कारवाई; युनियनची ३ महिन्यांच्या मुदतवाढीची मागणी

पुढील लेख
Show comments