Marathi Biodata Maker
✕

नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न करणार : अजित पवार

Updated: शनिवार, 15 जुलै 2023 (21:44 IST)
 
यावेळी राज्यात अजून पुरेसा पाऊस नाही, ही चिंतेची बाब आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले आहे. या संदर्भात सविस्तर आढावा घेतला आहे. पदभार स्विकारल्यानंतर मी अर्थ आणि इतर विभागांचाही आढावा घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
शुक्रवारी रात्री अचानक शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हरओक बंगल्यावर गेले. यावर अधिक माहिती देतांना अजित पवार म्हणाले, “काकींचं शुक्रवारी एक ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. मला दुपारीच ऑपरेशन झाल्या झाल्या त्यांना भेटायला जायचं होतं. मात्र, उशीर झाला. कारण खातेवाटप जाहीर झालं, मी मंत्रालयात होतो, विधानभवनात होतो, अधिवेशन सोमवारपासून असल्याने विधानसभा अध्यक्षांनाही भेटायचं होतं.”
 
माझं काम संपवल्यावर मी फोन केला तेव्हा सुप्रिया सुळेंनी मला सांगितलं की, दादा आम्ही आता सिल्व्हर ओककडे निघालो आहोत. तू तुझं काम झाल्यावर सिल्व्हर ओकलाच ये. मला काकींना भेटायचंच होतं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी शेवटी वर्षानुवर्षांचं नातं आहे. आपण परिवाराला महत्त्व देतो ही भारतीय परंपरा आहे. त्यामुळे साहजिकच मी गेलो, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
 
आमच्या आजीआजोबांनी आम्हा पवार कुटुंबियांना ही परंपरा शिकवली आहे. त्यानंतरच्या काळात आई-वडील, काका-काकी यांनी शिकवली. म्हणून मी काकींना भेटायला गेलो होतो. मी अर्धा तास तिथं होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली, खुशाली विचारली. त्यांना २१ दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. माझ्या अंतर्मनाने सांगितलं की, तिथं गेलं पाहिजे आणि मी तिथं गेलो,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

Edited By - Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

LIVE: गडचिरोलीच्या कोपरशी जंगलात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली

कोकणातील भातशेती संकटात? उत्पादन घटण्याची भीती; कोकणातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या गोष्टी

गडचिरोलीच्या कोपरशी जंगलात माओवादविरोधी कारवाईदरम्यान शस्त्रे आणि स्फोटके जप्त

फक्त ₹५.६० लाखांत घरी आणा Hyundai ही कार; तब्बल ₹७५,००० ची होईल बंपर बचत!

अखिल भारतीय आघाडीत महिला खासदारांना वाईट वागणूक, संजय राऊत यांचा मोठा आरोप

पुढील लेख
Show comments