मंगळवार, 21 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : सोमवार, 13 मार्च 2023 (15:27 IST)

नवीन बाळाचे आगमन शुभेच्छा New Born Baby Wishes in Marathi

आजवरचे घर नुसते घर होते
बाळाच्या येण्याने ते
गोकुळ होऊन गेले
तुमच्या कुटुंबाला देवाने दिलेल्या अमूल्य भेटीबद्दल
तुमचे हार्दिक अभिनंदन
 
तुमची इच्छा तुमच्या आकांक्षा
उंच – उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा 
बाळास उदंड आयुष्य लाभू दे
बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा
 
घरात आला पाहुणा खास
ज्याची होती कायमची आस
आई वडीलांना आणि बाळाला
भरभरुन उत्तम आशिर्वाद
 
इवल्याशा पावलांनी सजवी घरदार
अमूल्य पाहुणा पडला पदरात
बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा
 
देवरायाच्या देव अमूल्य ठेवा,
असा गोंडस बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा
 
इवल्याशा पावलांना पाहून
गेले मन भारावून
आई वडील होण्याचा आनंद आहे खास
भरभरुन उत्तम आशिर्वाद
 
इवल्याशा पणतीने सगळे घर प्रकाशित केले
इवल्याशा बाळाने सगळे घर आनंदित केले
असा गोंडस बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा
 
आगमन नव्या बाळाचे अभिनंदन आई-बाबांचे
बाळास अनेक आशीर्वाद व शुभेच्छा
बाळास उदंड आयुष्य लाभू दे
 
पहिली बेटी धनाची पेटी
कन्यारत्न झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा
 
बाळाच्या आगमनाची गोड बातमी कानी आली
आई-बाबा म्हणून भरती होताना नात्याची वीण अधिक घट्ट झाली
बाळाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
घरातील नव प्रमुख पाहुण्याच्या आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा
 
ओठांवर हसू गालावर खळी,
तुमच्याकडे उमलली आहे छोटीशी नाजूक कळी
मुलीच्या जन्माबद्दल खूप खूप अभिनंदन
 
आगमन नव्या बाळाचे
कारण बनले उत्साहाचे
नव्या शिशुच्या जन्मानिमित्त 
हार्दिक हार्दिक शुभेच्छा
 
छोटीशी बोटं, छोटेसे हात
इवल्याशा पावलांनी केली आहे आनंदाची बरसात
घरात आला आहे लाडोबा
सोबत आहे आशिर्वादाची साथ
बाळाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
गोंडस बाळ जन्माची बातमी आली
आई बाबा नावाची आज तुम्हाला पदवी मिळाली
बाळ जन्माच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 
 
आज तुमच्या घरी बालकृष्ण जन्माला आला
नव्या नात्याची वीण आणखीन घट्ट झाली 
आता तुम्ही आई बाबा झाला
बाळाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
सूर्याचे तेज घेऊन
चंद्राची शीतलता घेऊन
आला पुत्र महान
बाळाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
जसा लहानगा दिवा रोशन करतो घराला
तसाच तुमचा पुत्र आनंद ठरेल घराला
बाळ जन्माच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 
 
नव्या बाळाचा जन्म झाला 
झाला तुम्ही आई-बाबा
जगण्याला नवे कारण मिळेल 
आनंदाने नांदो तुमचा नवा घरोबा
नवशिशुच्या जन्मानिमित्त खूप खूप शुभेच्छा
 
इंद्रधनुष्य सारख्या नवछटांनी आकाश नाहून निघाले
घरात आनंद जन्माला येऊन बाळ सुख समृद्धीचे कारण झाले
नवशिशुच्या जन्मानिमित्त खूप खूप शुभेच्छा
 
छोट्या छोट्या पावलांनी घर भरून जाईल
बाळाच्या जन्मामुळे तुमच्या आनंदाला उधान येईल
नवशिशुच्या जन्मानिमित्त खूप खूप शुभेच्छा
 
आतापर्यंत घर म्हणजे होत्या नुसत्या भिंती
बाळाच्या येण्याने घराला आता घरपण आले
इवल्याशा जीवाच्या जन्माने तुमच्या आनंदाला उधाण आले
तुम्हाला खूप खूप अभिनंदन