Dharma Sangrah
✕

मुले अपशब्द वापरतात, रागावू नका या टिप्स अवलंबवा

Updated: बुधवार, 26 मार्च 2025 (14:57 IST)
 
मुलांना एक प्रश्न विचारा, की त्याने हे कुठून ऐकले. कारण अशी भाषा तो कुठून शिकला आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याच्याकडे लक्ष द्या. जेणेकरून असे पुन्हा होऊ नये. 
ALSO READ: या टिप्सचा अवलंब केल्याने तुमचे तुमच्या मुलांशी नेहमीच चांगले नाते राहील
मुलांना मारहाण करू नका. त्यांना प्रेमाने समजावून सांगा. त्याच्या सोबत बसा आणि त्याला समजावून सांगा.की तो जी भाषा बोलत आहे.ते चुकीचे आहे.असे पुन्हा बोलू नये. 
 
 जर तुमच्या मुलाने रागाच्या भरात अपशब्द वापरले असतील आणि ते शब्द रागाच्या भरात त्याच्या तोंडून बाहेर पडले असे तो म्हणाला असेल, तर त्याला हे समजावून सांगणे महत्वाचे आहे की तो अपशब्द न वापरताही आपला राग व्यक्त करू शकतो. लहान मुलांना शब्दांचे इतके ज्ञान नसते. म्हणून, त्यांना योग्य शब्दांचा पर्याय द्या, जेणेकरून मुले योग्य शब्दांचा वापर करून राग व्यक्त करू शकतील.
ALSO READ: पांडा पेरेंटिंग म्हणजे काय, मुलांना वाढवण्यासाठी ते सर्वोत्तम का मानले जाते?
मुलांना वेळ द्या 
मुले लगेच सुधारतील अशी अपेक्षा करू नका.या साठी त्याला पुरेसा वेळ द्या. मुलांना त्याच्या वर्तनाबद्दल समजावून सांगा. जेणेकरून तो व्यवस्थित समजेल. गरज पडल्यास त्याला रागवा.पण मारहाण करू नका 
अन्यथा त्याच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
 
हे लक्षात ठेवा की जर मूल गैरवर्तन करत असेल तर त्याला समजावून सांगण्यासोबतच तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, मुले अनेकदा टेलिव्हिजन, सोशल मीडिया आणि त्यांच्या मित्रांच्या गटांमधून गैरवापर शिकू शकतात. अशा परिस्थितीत, मूल ही भाषा कुठून शिकत आहे याकडे लक्ष द्या आणि त्याच्या सभोवतालचे वातावरण सुधारण्याचा प्रयत्न करा. जर घरात कोणी शिवीगाळ करत असेल तर प्रथम त्याला समजावून सांगा की त्याने मुलासमोर त्याच्या भाषेची आणि वर्तनाची  काळजी घ्यावी. 
Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

शाही तुकडा आणि बासुंदी: दिवाळीच्या पाहुण्यांसाठी झटपट बनणारे खास स्वीट डिश

प्रदूषणापासून मुलांचे संरक्षण करायचे आहे? योग्य मास्क निवडताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये पदवीधर आणि डिप्लोमा उमेदवारांसाठी संधी, अर्जप्रक्रिया जाणून घ्या

कांद्याची साले फेकून देऊ नका! केस दाट, लांब आणि चमकदार बनवण्यासाठी असा करा वापर

रात्री झोपताना सतत विचार येतात? अतिविचार थांबवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय!

पुढील लेख
Show comments