या दिवसात स्वत:ला रोखू शकत नाही महिला, त्यांना शारीरिक संबंध ठेवायला आवडणारे दिवस जाणून घ्या
अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की स्त्रियांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा वाढणे हा प्रकार महिन्यातून सुमारे सहा दिवस सर्वात जास्त दिसून येतो. खरं तर हे ल्युटिनायझिंग हार्मोनच्या उत्पादनाशी जुळते. जेव्हा स्त्रियांच्या शरीरात ल्युटीनायझिंग हार्मोन्सची सर्वाधिक वाढ होते, तेव्हा त्या लैंगिक संबंध ठेवण्यास अधिक प्रवृत्त होते.
महिलांना दर महिन्याच्या ठराविक वेळी संबंध ठेवण्याची जास्त इच्छा असते. ज्या स्त्रिया त्यांच्या मासिक पाळीचा मागोवा घेतात त्यांच्या लक्षात आले असेल की त्यांची लैंगिक इच्छा ओव्हुलेशनच्या आधी वाढते. ओव्हुलेशन दरम्यान महिला नैसर्गिकरित्या गर्भवती होऊ शकतात, त्यामुळे त्यांच्या शरीरात या काळात हार्मोन्सचे उत्पादन वाढते, ज्यामुळे त्यांची लैंगिक इच्छा देखील वाढते.
दर महिन्याचे सुमारे सात दिवस महिलांची प्रजनन शक्ती शिखरावर असते. जेव्हा स्त्रिया ओव्हुलेशनचे दिवस जवळ येऊ लागतात तेव्हा त्यांची कामवासना वाढू लागते आणि ओव्हुलेशन नंतर महिलांची संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते. अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की स्त्रियांमध्ये लैंगिक इच्छा वाढणे हे सुमारे सहा दिवस सर्वात जास्त असते.
ओव्हुलेशनच्या 24 ते 36 तास आधी ल्युटिनायझिंग हार्मोन शिखरावर असतात. या काळात महिलांनी आपल्या जोडीदारासोबत संबंध ठेवल्यास त्यांना गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते. ओव्हुलेशनच्या आधीच्या 3 दिवसांत महिलांची गर्भधारणा होण्याची शक्यता 8% ते 23% पर्यंत असते. ओव्हुलेशनच्या आदल्या दिवशी ते 21% आणि 34% च्या दरम्यान वाढते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ओव्हुलेशन झाल्यानंतर महिलांच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण वाढते, त्यामुळे महिलांची इच्छा कमी होत जाते.