शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (09:06 IST)

Husband Wife Fighting जर पती-पत्नीमध्ये जास्त भांडणे होत असतील तर हे ज्योतिषीय उपाय प्रभावी ठरतील

नवरा बायकोचं नातं खूप खास असतं. मात्र नात्यात कधीही भांडणे होत नसतील असे घडत नाही. कोणत्या नात्यात भांडण होत नाही? असे म्हणतात की जिथे चार भांडी असतील तिथे ते वाजतील. त्याचप्रमाणे पती-पत्नीमध्ये भांडणेही होतात. पण कधी-कधी वाद मर्यादेपलीकडे वाढू लागले की मग नात्यात दुरावा निर्माण होतो. सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्ने तुटू लागतात. तुमच्या नात्यातील भांडणे आणि वाद थांबण्याचे नाव घेत नसतील तर त्यासाठी ज्योतिषीय उपायांचा अवलंब करावा. नात्यात सुरू असलेली दुरावा दूर करण्यासाठी काही उपाय करता येतात.
 
भगवान शिव आणि पार्वतीचा फोटो- ज्या पती-पत्नीमध्ये रोज भांडणे होतात, त्यांनी घरात शिव-पार्वतीची मूर्ती ठेवावी. त्यांची रोज पूजा करावी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी देवाकडे प्रार्थना करावी. याशिवाय घराच्या उत्तरेकडील भिंतीवर भगवान विष्णू आणि लक्ष्मीजींचे चित्र लावावे. कारण त्यांना प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
 
कापराचा उपाय- पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या भांडणापासून मुक्ती मिळवण्यासाठी कापूर हा अतिशय प्रभावी उपाय आहे. कापूर हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो, त्यामुळे त्याचा उपयोग पूजेमध्ये केला जातो. याद्वारे तुम्ही तुमच्या पतीसोबतचे वाद दूर करू शकता. यासाठी पत्नीने उशीखाली कापूर ठेवून झोपावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कापूर जाळावा. हा उपाय रोज केल्याने नाते सुधारण्यास सुरुवात होईल.
 
देवाला फुले अर्पण करा- गुलाबाचे फूल हे प्रेमाचे लक्षण असल्याचे म्हटले जाते. फुले देऊन प्रेम व्यक्त होते असे म्हणतात. तसेच पती-पत्नीमधील भांडण संपण्याचे नाव घेत नसेल तर शुक्रवारी मंदिरात जावे. तिथे जाऊन भगवान लक्ष्मी नारायणाचे दर्शन घ्या. यानंतर त्याच्या चरणी दोन गुलाब अर्पण करावे. असे म्हणतात की हे काम मनापासून केल्याने पती-पत्नीमधील कटुता कमी होते.
 
पिंपळाला तुपाचा दिवा- भांडणाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी गुरुवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. यानंतर चौकाच्या मध्यभागी मिठाई दिव्यासह ठेवा. काही दिवसातच तुम्हाला या उपायाचा प्रभाव दिसून येईल.