सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह शायरी
Written By

Marriage Wishes In Marathi लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Wedding Snake
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..
 
येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न साकार व्हावीत
हीच आमची इच्छा
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
 
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न- संसार आणि जवाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार सुखाचा..
हीच प्रार्थना परमेश्वराला..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
 
आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो..
आयुष्यात सतत प्रेम बहरत राहो...
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
 
आयुष्याच्या या नव्या वळणावर,
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे,
दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा...
 
लग्न म्हणजे एक प्रवास
दोन जीवांचा आणि दोन मनांचा
दोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा..
हा प्रवास सुखकर होवो... हीच इच्छा
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..
 
जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे,
घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे…
लग्नाच्या शुभेच्छा
 
लग्न म्हणजे जुळलेले बंध, 
लग्न म्हणजे नवे अनुबंध… 
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
लग्न म्हणजे रेशीम गाठ
अक्षता आणि मंगलाष्टका सात
दोनाचे होणार आता चार हात
दोन जीव गुंतणार एकमेकांत
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..
 
हळदीचा सुगंध आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेमभरल्या 
रेशीमगाठीत बांधलेली,
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..
 
तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं,
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे
लग्नासाठी मनापासून शुभेच्छा