सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह कोटेशन
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मे 2022 (12:42 IST)

Marriage Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

marriage
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !
 
तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्मी असंच रहावं आणि
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावेत..
तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा!
 
तुम्हा दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा.
एकमेकांसाठीच तुम्ही जन्म घेतला असल्यासारखे वाटते !
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आयुष्याच्या या नव्या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे..
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा,
तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा!
 
सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा !
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले
नाते प्रेमाचे आज विवाहात बद्ध झाले
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !
 
आयुष्याचा हा प्रवास आजपासून सुरू झाला आहे
आणि तो असाच अप्रतिमरित्या चालत राहो !
लग्नासाठी मनापासून अभिनंदन
 
लग्नासाठी अभिनंदन. तुमचं आयुष्य प्रेमाने भरलेले राहो
आणि आजन्म तुम्ही एकत्र राहो हीच मनापासून इच्छा !
 
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
 
लग्न म्हणजे जुळलेले बंध,
लग्न म्हणजे नवे अनुबंध…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
नाती जन्मोजन्मींची,
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
गोड गोजिरी लाड लाजिरी,
होणार आज तू नवरी..
लाडकी आई बाबांची,
होणार सून आता एका नव्या घराची..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ..
लग्न म्हणजे एक प्रवास,
दोन जीवांचा, दोन मनांचा,
दोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा..
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुम्हा दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा.
एकमेकांसाठीच तुम्ही जन्म घेतला असल्यासारखे वाटते.
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा..
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
चंद्र आणि तारांनी आयुष्य तुमचे भरलेले असावे
आणि आयुष्यभर तुमच्या दोघांत प्रेम खूप असावे
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आजच्या या मंगलमय दिनी ईश्वराकडे प्रार्थना आहे की 
तुम्ही पाहिलेले सर्व स्वप्ने पूर्ण व्हावेत तुम्हाला सुखी आयुष्य लाभावे
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा