Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माहेरवाशीण

Updated: मंगळवार, 28 जुलै 2020 (11:39 IST)
पानातली डावी उजवी बाजू परिपूर्णतेने नटलेली पान पाहताक्षणी मन सुखावते 
उदराग्नि शांत होतो 
सगळे मोठे जराशाने लवंडतात, तर सान मात्र परसदारीच्या मोठ्या झाडाला बांधलेल्या झोपाळ्याकडे वळतात....
झोका आकाशात नेण्याची जणू स्पर्धाच सुरू होते .....
परकराचे ओचे करून केसातला गजरा सांभाळत ...पायाने रेटा देत झोका उंच-उंच नेला जातो 
हातावर रंगलेली मेंदी असते 
प्रत्येकीचे रंग नव्याने न्याहाळले जातात .............
तिकडे जमलेल्या सगळ्या माहेरवाशिणी शांततेने तृप्ततेने थोड्या सैलावतात..... 
थोडीशी नवलाई असते ना त्याची देवाण घेवाण होते 
मग संध्याकाळी आरतीची  तयारी आणि नंतरचे खेळ, जागरण याचे बेत ठरू लागतात 
माहेरी आल्याचा आनंद मात्र मनात मावेना असतो  
सततच चेहर्याचवरच्या हावभावात डोकावत असतो 
जिवलगा पासून दूर असण्याची हुरहूरही कुठेतरी लपलेली असते...... 
जिवाभावाच्या सख्या मात्र आता 
कधीतरी भेटणाऱ्या झाल्याने त्यांच्यात खूप आनंद वाटतो 
ओल्या शेंगा भाजलेल्या कणसांचा खमंग वास 
आणि आटीव दुधाचे पेले भरत जागरणाची तयारी सुरू होते 
आणि नंतर सुरु होतो तो एकेक खेळ .......हळूहळू रात्रीचे प्रहर लोटतात .....खेळही आता टिपेला पोहोचलेला ,पण थकण्याची जाणीव करून देणारा झालेला असतो 

कुठेतरी थोडेसे उजाडते न उजाडते तोच .....
गौरी विसर्जनाची तयारी सुरू होते ........आणि माहेरवाशिणींना मग मात्र आपल्या घराची ओढ लागते. 
माहेरची आस मनात ठेवून जड पावलाने मग ती सासरची वाट धरते.. 
साथीला असतो ना तोच पुन्हा धुंद करत  .....सोबत करणारा हवाहवासा पाऊस ..............
आता तीच सृष्टी कुंद वातावरणात भारावलेली वाटते..... जडवलेली वाटते 
कारण मन भरून आलेले असते 
ओल्या वाटा हळूच अश्रुचा ओलेपणा सामावून घेतात आणि माहेरचा प्राजक्ता गंध गाठीशी बांधून घेतात........
सासरची वेस येईपर्यंत ती पुन्हा भानावर येते .......घरची ओढ मनात दाटलेली असते 
नव्या हुरहुरीने आसुसल्या मनाने 
ती आपल्या घरी परतते 
आपल्या घराकडून .....आपल्या घराकडचा .......हा प्रवास प्रत्येकच माहेरवाशिणीला माहित असणारा ......
पण प्रत्येकवेळी नवीन अनुभव देणारा असतो ....
यात मात्र काही शंका नाही........
- माधवी... 

सर्व पहा

गुरुवारी व्रत करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, पूर्ण होतील सर्व इच्छा

नागपंचमी २०२६ जवळ आली! महाराष्ट्रात पूजेसाठी कोणते साहित्य लागते? जाणून घ्या संपूर्ण यादी

श्रावणात महादेवाला 'हे' एक पान वाहिल्यास दूर होतील सर्व अडचणी; जाणून घ्या शास्त्र काय सांगते!

Shravan Somvar Vrat: श्रावणी सोमवारी उपवासाला काय खावे आणि काय टाळावे? पाहा पूर्ण डाएट लिस्ट

दिव्याच्या अमावस्येला नैवेद्यात काय बनवावे? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments