Dharma Sangrah
✕

अरणमध्ये रंगला श्रीफळ हंडी सोहळा

Updated: बुधवार, 7 ऑगस्ट 2013 (14:43 IST)
संतश्रेष्ठ सावता महाराज यांच्या पुण्तिथीचनिमित्ताने श्रीक्षेत्र अरण येथे हजारो भाविकभक्तांनी संत शिरोमणी सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले तर श्रीफळ हंडीच्या कार्यक्रमाने दोन दिवसांच्या यात्रा उत्सवाची सांगता झाली.

प्रतिवर्षी श्री पांडुरंगाची पालखी सावता महाराजांच्या भेटीसाठी अरणला येत असते. यंदा या पालखीचे सोमवारी अरण येथे आगमन झाले होते. मंगळवारी ही पालखी कोठवळे-शिंदे वाडय़ावरून मंदिरात आणली गेली. दुपारी ह.भ.प. बाळासाहेब देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले आणि तनंतर श्रीफळ हंडी कार्यक्रमाने दोन दिवसाच्या या महोत्सवाची सांगता झाली.

सोमवारपासूनच विठ्ठलभक्तांनी अरण येथे सावता महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मंगळवारी देखील अरण गावात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी यात्रा समितीच्यावतीने मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरात प्रासादिक साहित्य, धार्मिक ग्रंथ, सावता महाराज चारित्र आदी साहित्य विक्रीची दुकाने, खेळणी, इमिटेशन ज्वेलरी आदींची दुकाने मोठ्या संख्येने थाटली होती. दोन दिवसात हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करा आणि पाहा चमत्कार! मिळतील हे अद्भूत फायदे

मृत्यूनंतर नाकात आणि कानात कापूस का घातला जातो? गरुड पुराणानुसार यामागचे रहस्य जाणून घ्या

२२ नोव्हेंबर रोजी रवि प्रदोष व्रत: काय करावे, काय टाळावे? • जाणून घ्या पूजेचे नियम आणि फायदे

Vaikuntha Chaturdashi 2026: जेव्हा विष्णूंनी महादेवांना अर्पण केला होता स्वतःचा डोळा! जाणून घ्या वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

Show comments