Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपंचमीला गालिप्रदानाची परंपरा !

Updated: शनिवार, 3 ऑगस्ट 2013 (17:16 IST)
नागपंचमी साजरी करण्याची पद्धती सगळीकडे वेगवेगळी आहे. काही ठिकाणच्या प्रथा-परंपराही वेगळ्या आहेत. उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात कुस्ती आणि बौद्धिक वादविवाद करण्याची या दिवशी प्रथा आहे. पण चांदोली जिल्ह्यातील विसपूर व महुआरी गावात मात्र या दिवशी संवाद होतो, पण तो शिव्यांनी. होय, तुम्ही वाचता ते योग्यच आहे. या दोन गावात या दिवशी मुक्त गालीप्रदान होते. इतकेच नव्हे, तर परस्परांवर दगडफेकही केली जाते. पण या दिवसानंतर मात्र त्यांच्यात कोणताही राग, द्वेष रहात नाही. हे सगळं फक्त एका दिवसासाठी असत े.

ही विचित्र प्रथा बंद करण्याचेही एकदा ठरविण्यात आले होते. मात्र, गावावर आपत्ती कोसळल्यानंतर ही प्रथा बंद करण्याचा विचार दूर सारण्यात आला. उलट ही प्रथा अधिक जोमाने साजरी केली जाऊ लागली. त्याला उत्सवी रूप आले.

नागपंचमीच्या दिवशी दोन्ही गावातील लोक हद्दीवर येतात. परस्परांना शिव्या देतात. निंदा करतात. परस्परांवर दगडही फेकतात. दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम सुरू होतो. सुरवातीला महिला कजरी व सोहर ही इथल्या परंपरेने चालत आलेली गीते गातात. देवाला प्रसन्न करण्यासाठी असे केले जाते. त्यानंतर मग गालिप्रदान सुरू होते.

प्रामुख्याने महिला एकमेकांना शिव्या घालतात, उणीदुणी काढतात. त्यानंतर पुरूष परस्परांवर दगडफेक करतात.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

Somvar Mahadev Mantra Jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

संकष्टी चतुर्थी: गणपतीला अर्पण करा या ३ गोष्टी, विघ्ने दूर होण्याची मान्यता

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

Show comments