Festival Posters
✕

मराठमोळ्या अविनाश साबळेने 13:25.65 मिनिटांत शर्यत पूर्ण केली, बहादुर प्रसादचा 30 वर्ष जुना विक्रम मोडला

Updated: शनिवार, 7 मे 2022 (13:56 IST)
 
साबळे यांच्या नावावर 3000 मीटर स्टीपलचेसचा विक्रम आहे
सर्वात कमी वेळेत 3000 मीटर स्टीपलचेस पूर्ण करण्याचा विक्रम अविनाश साबळे यांच्या नावावर आहे. त्याने स्वतःचाच विक्रम अनेकदा मोडला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अविनाश साबळेने 8:18.12 वेळेसह राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला, परंतु अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही. या स्पर्धेत त्याने सातवे स्थान पटकावले. याआधीही तीन हजार मीटर स्टीपल चेसचा विक्रम त्याच्या नावावर होता. साबळेने मार्च 2021 मध्ये फेडरेशन कपमध्ये 8:20.20 मिनिटांत शर्यत पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम केला.
 
30 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेला अविनाश हा लष्कराचा शिपाई आहे. 27 वर्षीय तरुणाने बहादुर प्रसादचा राष्ट्रीय विक्रम मोडला, ज्याने 1992 मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या स्पर्धेत 13:29.70 मिनिटांत शर्यत पूर्ण केली. साबळेने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम अनेकदा मोडला आहे. तिरुवनंतपुरममधील इंडियन ग्रांप्री दरम्यान, त्याने 8:16.21 मिनिटांत शर्यत पूर्ण करून सातव्यांदा स्वतःचा विक्रम मोडला. 15 जुलैपासून अमेरिकेत होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो आधीच पात्र ठरला आहे.
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दमदार लूक आणि जबरदस्त फीचर्ससह नवीन Honda CB500 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

नागपूर डेंटल कॉलेजमध्ये उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्याचे रॅगिंग; विवस्त्र करत 'मुर्गा' बनवून अश्लील कृत्य करण्यास पाडले भाग

'गोकुळ'च्या खटल्यासाठी ८० लाखांची फी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद, काँग्रेसचा सरकारवर जोरदार प्रहार

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

LIVE: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचे उत्तर

पुढील लेख
Show comments