शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (10:54 IST)

2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारत सर्वात जास्त पदक जिंकेल : राजवर्धनसिंग राठोड

सध्या भारतीय युवा खेळाडूंचा कल विविध खेळांकडे वाढला असून आगामी 2028 ऑलंम्पिक स्पर्धेत भारताचे खेळाडू जास्तीत जास्त पदके मिळवतील आणि जास्त पदके मिळणाऱ्या देशांच्या पंक्तीत भारताचा समावेश होईल असे वक्तव्य भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी पणजी येथे कार्यक्रमात बोलताना केले.
 
या कार्यकमात पुढे बोलताना राठोड म्हणाले, 2018 हे वर्ष भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी खूप चांगले गेले आहे. मला भारतातील युवा खेळाडूंकडून खूप अपेक्षा आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कर्तृत्वावर देखील विश्वास आहे. त्यांना संधी मिळण्यासाठी आम्ही प्रक्रिया चालू केली आहे. त्याचे फळ भविष्यात चांगले मिळेल.
 
टोकियो ऑलंम्पिक (2020) खूप जवळ आहे. आम्हाला माहिती आहे की आम्ही त्यात कशी कामगिरी करणार आहेत. त्यामुळे आमचे लक्ष्य हे 2024 आणि 2028 ऑलंम्पिकवर आहे. असे ही त्यांनी यावेळी नमूद केले. 2024 ऑलंम्पिक स्पर्धा पॅरिस शहरात होणार आहे तर 2028 ऑलंम्पिक स्पर्धा लॉस अँजेलीस येथे पार पडणार आहे.