मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

95 किलोमीटर मायलेज देणारी स्वस्त स्पोर्ट्स बाइक, विश्वासच बसणार नाही..

पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य माणसाच्या खिश्याला कात्री लागत आहे. अशात कमी मायलेजसह महागड्या दुचाकी वाहनांच्यामध्ये टीव्हीएस मोटर कंपनीने उत्सवाच्या हंगामात अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टीव्हीएस स्पोर्ट बाइकचा विशेष संस्करण लॉन्च केला आहे. टीव्हीएस स्पोर्ट स्पेशल ऍडिशनने लांब सीट्ससह अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडले आहे. टीव्ही स्पोर्ट स्पेशल ऍडिशनने नवीन डेकल्स, स्टाईलिश साइड व्यूह मिरर आणि थ्रीडी लोगो देऊन त्याचे स्वरूप अद्ययावत केले आहे.
 
सर्वात खास गोष्ट म्हणजे बाइकची किंमत, आर्थिकदृष्ट्या बाइक इतर वाहनांच्या तुलनेत स्वस्त आहे. दिल्लीतील एक्स-शोरूममध्ये त्याची किंमत 40,088 रुपये आहे. ही पहिली 100 सीसी बाइक आहे, ज्यामध्ये सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग सिस्टिम (एसबीटी) दिला जातो. एसबीटी सुरक्षा वैशिष्ट्य ही टीव्हीएस कंपनीची संयुक्त ब्रेकिंग प्रणाली आहे.
 
टीव्हीएस स्पोर्ट स्पेशल ऍडिशनमध्ये मानक टीव्हीएस स्पोर्ट इंजिन आहे. त्यात दिलेले 99.7 सीसी इंजिन 7500 आरपीएमवर 7.3 बीएचपी ऊर्जा आणि 7500 आरपीएमवर 7.5 एनएम पीक टॉर्क तयार करते. इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे. सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की या स्पोर्ट बाइकचा मायलेज 95 किलोमीटर प्रति लीटर आहे असा दावा कंपनी करीत आहे. ही बाइक इलेक्ट्रिक स्टार्ट आणि किक स्टार्ट, दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. या बाइकमध्ये दोन कलर पर्याय येतील. एक ब्लॅक कलरसह रेड-सिल्वर आणि इतर ब्लॅक कलरसह ब्लु-सिल्वर.