सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018 (08:16 IST)

फ्लिपकार्टचा फेस्टीव धमाका सेल

फ्लिपकार्टने येत्या २४ ते २७ ऑक्टोबरदरम्यान फेस्टीव धमाका सेल असे ठेवण्यात आले असून ग्राहकांना जवळपास १०० हून अधिक उत्पादनांवर सूट मिळणार आहे. यात फ्लिपकार्ट प्लस मेंबर्स असणाऱ्यांना इतर ग्राहकांपेक्षा आधी या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. या ग्राहकांसाठी २३ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता सेल सुरु होणार आहे. तर इतरांसाठी २४ पासून सुरु होईल. यंदा फ्लिपकार्टने अॅक्सिस बँकेशी टायअप केले असून त्यावरुन व्यवहार करणाऱ्यांना डिस्काऊंट देण्यात येणार आहेत. सोबतच यामध्ये एक्सचेंज ऑफर्स, बायबॅक गॅरंटी यांसारख्या सुविधाही मिळणार आहेत.      
 
या सेलमध्ये मोबाईल, एलईडी टीव्ही, लॅपटॉप आणि इतर गोष्टींसाठी डिस्काऊंट देण्यात येणार आहे. यावर असणाऱ्या ऑफर्स दर ८ तासांनी रिफ्रेश करण्यात येणार आहेत. Oppo F9 हा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरीचा फोन १८,९९० रुपयांना ३ हजारांच्या डिस्काऊंटने मिळणार आहे. तर Vivo V9 ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरीचा फोन ८ हजारांच्या डिस्काऊंटने १५,९९० रुपयांना मिळणार आहे. 
 
इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर जवळपास ८० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. ब्रँडेड कॅनन, सोनी, निकॉन यांसारख्या कंपन्यांच्या DSLR कॅमेरावर १५ हजारांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. वेगवेगळ्या ब्रँडच्या स्पिकर आणि हेडफोन्सवर ७५ टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. Intel Core i3 हा २७,४९० रुपयांचा लॅपटॉप ग्राहकांना २१,९९० रुपयांना मिळेल. तर सॅमसंगचा ३२ इंचाचा एचडी टीव्ही १५,९९९ रुपयांना मिळेल.