राष्ट्रवादीचा हा माजी आमदार देतो गलीच्छ शिव्या क्लिप झाली व्हायरल
आमदार असलेल्या सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक (आबा) साळुंखे पाटील यांची एक वादग्रस्त ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. यात ते अत्यंत खालच्या थराला जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने साळुंखे पाटलांना फोन करुन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केव्हा करणार याबाबत विचारणा केली असता, त्यांनी बोलतना गलीच्छ शिव्या दिल्या आहेत. ही ऑडियो क्लिप सर्वत्र व्हायरल झाली आहे. या क्लिप मध्ये साळुंके महिला पदाधिकारी आणि इतरांना शिव्या देत असून माझ कोणी काही वाकड करू शकणार नाहीत असे बोलत आहेत. वाचा ते काय म्हणाले आहेत.
“शरद पवार आहेत तो पर्यत माझं कोणी सुद्धा वाकडं करू शकत नाहीत. त्या ‘बाई’ला ****आला असेल तर दे म्हणावं राजीनामा, **** कार्यकर्त्यांना मी भीक घालत नाही. कोणत्या **** राजीनामा द्यायचा आहे त्यांनी खुशाल द्यावा. मोहिते पाटलांचे चमचे, **** लोकांनी आपल्याला पक्ष निष्ठा शिकवू नये”… अशा प्रकारचे बेताल आणि शिवराळ संभाषण या ऑडियो क्लिपमध्ये समोर आले असून अजून तरी साळुंके यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाहीत.