सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (15:32 IST)

अवनि अर्थात टी १ वाघीणीचा कोर्टाने मागवला आहवाल, याचुकेवर लवकरच सुनावणी

नागपूर खंडपीठानं यवतमाळची नरभक्षक वाघीण टी-१ अर्थात अवनी हिला पकडण्यासाठी किंवा मारण्यासाठी वनविभागानं आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांवर सविस्तर आढावा अहवाल मागवला आहे. न्यायालयानं शूटर शाफत अली खान याच्या भूमीकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. टी-वन प्रकरणी न्यायालयात 'अर्थ ब्रिगेड' या संस्थेनं याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता वाघिणीला वाचवायला बळ मिळाले आहे. दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली आहे. सुनावणीत टी-वन वाघिणीसंदर्भात अहवाल मागवला असून पुढील सुनावणी २२ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. अवनि वाघीण नरभक्षक असल्याच्या कारणावरून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आले आहेत. मात्र यवतमाळच्या टी -१ वाघिणीला वाचवण्यासाठी वन्यजीव प्रेमींनी आता सोशल मीडियाचा जोरदार आधार घेतला आहे. मोहिमेस केवळ भारतच नाही तर जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सरकार आणि कोर्टवर दबाव वाढला आहे. नरभक्षक असल्याच्या कारणावरून यवतमाळच्या जंगलातील 'अवनी' (टी -१) वाघिणीला ठार मारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने वनखात्याला दिले असून,  त्यानुसार वन विभागाने हैदराबादचा शुटर नवाब शाफात आली खान यालाही बोलावले होते.