बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 (09:35 IST)

सनातनच्या कार्यकर्त्यांचा सत्कार नाही धिक्कार व्हायला हवा ;

- शिवसेनेला याची किंमत मोजावी लागेल - विद्या चव्हाण
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांच्याविरोधात आज प्रचंड घोषणाबाजी केली. मुंबई मराठी पत्रकार संघात खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पुनाळेकर यांचा सत्कार करण्यात आला. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्त्वात आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत आणि सनातन संस्थेविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
 
यावर प्रतिक्रिया देताना विद्या चव्हाण म्हणाल्या की अनेक विचारवंतांच्या हत्येत सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे धागेदोरे सापडत आहेत. अशा सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यापेक्षा धिक्कार करायला हवा. शिवसेनेवर निशाणा साधत विद्या चव्हाण म्हणाल्या की सनातनसारख्या हिंसक संस्थेच्या पुनाळेकर यांचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामार्फत सत्कार करण्यात येत आहे. हा प्रकार फार दुर्दैवी आहे. या प्रकारामुळे शिवसेनेची प्रतिमा मलीन होईल. येत्या काळात शिवसेनेला याची राजकीय किंमत मोजावी लागेल.