सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑक्टोबर 2018 (16:43 IST)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीच विडिंग पॅकेज अर्थात समुद्र किनारी लग्न करायची सुविधा

परदेशात समुद्र किनारी लग्न होतात. हाच धागा पकडत आता आपल्या देशात सुद्धा बीच वेडिंग सुरु होणार आहे. एमटीडीसीकडून लवकरच सिंधुदुर्गात बीच वेडिंग संकल्पना सुरू होणार आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यास सिंधुदुर्गात नवे टुरिस्ट डेस्टिनेशन निर्माण होईल. पाश्चिमात्य देशांप्रमाणेच भारतात देखील बीच वेडिंगची वाढती क्रेझ वाढतो असून, याच ठिकाणी नव विवाहितांना मधुचंद्र देखील आलिशान हॉटेल रेसोर्ट मध्ये करता येणार आहे. परदेशात तसेच भारतातील समुद्र किनारी खासगी हॉटेल्स आणि रिसॉर्ट मार्फत बीच वेडिंगची सुविधा पुरवली जाते. महाराष्ट्र पर्यटन महामंडळ राज्यात विशेष करून कोकणात पर्यटकांसाठी आदरातिथ्याच्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीच विडिंग पॅकेज सुविधेची भर पडणार आहे. कोकणातील उत्तम समुद्र किनारा लाभला आहे. देवगड तालुक्यातील मिठबाव इथे पर्यटन महामंडळाद्वारे नव्याने एक तारांकित हॉटेल उभारले आहे. याच ठिकाणी ही सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती एमटीडीसी प्रकल्प अधिकारी दीपक माने यांनी दिली आहे.