शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 (17:59 IST)

भाजपला धक्का या आमदाराचा राजीनामा, भेटणार राहुल गांधी यांना

भाजपला मोठा धक्का बसला आहे. विधार्भातील भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. राजीनामा हा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडेपाठवला आहे. ईमेल आणि फॅक्सद्वारे त्यांनी हा राजीनामा पाठवला अशी माहिती समोर येते आहे. आशिष देशमुख नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघाचे आमदार आहेत.आशिष देशमुख काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून ते राहुल गांधी यांना भेटणार आहे. वर्धा येथे राहुल गांधींची भेट घेण्याची देखील शक्यता आहे. वर्ध्याला होणाऱ्या काँग्रेसच्या संकल्प मेळाव्याला आशिष देशमुख हजेरी लावणार आहेत.विदर्भातील नाना पटोले यांच्यानंतर आशिष देशमुखही आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशमुख नाराज होते. वेगळ्या विदर्भासाठी ते आग्रही होते. वेगळ्या विदर्भासाठी कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते नाराज होते.त्यामुळे आता भाजप नेमकी काय प्रतिक्रिया देत आणि येत्या काळात पेट्रोल आणि इतर कारणानी जर राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली तर मग भाजपला मोठा धक्का बसणार आहे.