शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 1 ऑक्टोबर 2018 (16:57 IST)

पतीचे अनैतिक सबंध पत्नीची कंटाळून आत्महत्या

Suicide committed
आपल्या देशातील सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल देताना एकमताने ४९७ कलम रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विवाहबाह्य संबंध असणे हा गुन्हा ठरणार नाही हे स्पष्ट केले होता. निकालानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दक्षिण भारतातील तमिळनाडू येथे नवऱ्याने विवाहबाह्य संबंध ठेवल्याने बायकोने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तमिळनाडूमध्ये राहणारा जॉन पॉल फ्रैंकलिन याचे पुष्पलता हिच्या सोबत दोन वर्षापूर्वी लग्न केले होते. महिलेने घरच्यांच्या विरोधात जाऊन त्याच्या सोबत प्रेम विवाह केला होते. पुष्पलताला टीबीच्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे नवरा तिच्याशी संबंध ठेवले नाही. तो तिच्यापासून दूर राहू लागला होता. तसेच बायकोला टीबी असल्याने जॉन पॉलने विवाहबाह्य संबंध ठेवले असून, पुष्पलताला आपल्या नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल कळले होते. जॉल पॉल ह्याने बायकोला विवाहबाह्य असणे हा व्यभिचार नसल्याचे सांगितल्याने तिला धक्का बसला होते. यातूनच न्यायालयाच्या निर्णयामुळे ती नवऱ्याविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल करू शकली नाही, त्यातून तिने आत्महत्या केली आहे.