सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 (17:55 IST)

'या' मंदिरातही भाविकांना पारंपरिक पोषाखातच प्रवेश

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ३ हजार मंदिरांमध्ये हाच निर्णय लागू करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर प्रवेशाबाबत सदरचा निर्णय घेतला आहे. तसेच मंदिर आवारात मोबाइलने फोटो काढण्यावरही मनाई करण्यात आली आहे. 
 
जे भाविक या मंदिरात येतात त्यांना अशा लोकांकडे पाहून मनात लज्जा उत्पन्न होते. त्यामुळे अनेक भाविकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे. या निर्णयानुसार अंबाबाई मंदिरात यापुढे स्त्री आणि पुरुष भाविकांना पारंपरिक पोषाखातच प्रवेश देण्यात येणार आहे.