त्या लेस्बिअन मुलिंना सुरक्षा द्या न्यायालयाचे आदेश
राजस्थान येथून दिल्ली येथे पळून आलेल्या लेस्बिअन समलिंगी तरुणींना दिल्लीच्या उच्च न्यायालयाने पोलीस सुरक्षा देण्याचा आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोन तरुणींना एकमेकांशी लग्न करायचे आहे. उच्च न्यायालयाकडे तरुणींनी त्यांच्या प्रेम संबंधाला मान्यता मिळावी यासाठी याचिका दाखल केलीय. सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंध ठेवणे हा गुन्हा नसल्याचं नुकत्याच एक आदेश दिला आहे. आपल्या जीवाला कुटुंबीयांपासून धोका असल्याचं या दोघींनी केलेल्या याचिकेमध्ये म्हटलं होतं. हा धोका लक्षात घेता दिल्ली उच्च न्यायालयाने दोघींना पोलीस संरक्षण देण्याचा आदेश दिला आहे. राजस्थानमध्ये राहणाऱ्या या तरुणींचे वय 21 आणि 20 वर्ष आहेत. मागील अनेक वर्ष या दोघींमध्ये समलिंगी संबंध निर्माण झाले आहेत. जेव्हा ही बाब त्यांच्या घरच्यांना कळाली तेव्हा त्यांनी दोघींचा छळ करायला सुरुवात केली होती. तर त्यात एकीचा जबरदस्तीने साखरपुडा देखील केला आहे. तिच्या मनाविरुद्ध नोव्हेंबरमध्ये घरातील मंडळी लग्न लावून देण्याचं जाहीर केलं. यामुळे दोघींनी घरातून पळ काढला आणि दिल्ली गाठली आणि थेट कोर्टात याचिका दाखल केली आहे.