1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 (18:01 IST)

शेतकऱ्यांवरील या दडपशाहीची किंमत राज्यकर्त्यांना मोजावी लागेल - अजित पवार

ajit panwar
दिल्लीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर ज्याप्रकारे पोलिसांकडून बळाचा वापर झाला ते सरकारचे अपयश आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते Ajit Pawarयांनी केली आहे. असले सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करते, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडते, सरकार शेतकरीविरोधात लाठीचार्ज करते. हे सरकारंच शेतकरी विरोधात आहे तर यांच्याकडून काय अपेक्षा कराव्यात, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत नाही, कर्जमाफी नाही. एकीकडे मोठ्या उद्योगपतींना हजारो-कोटींची कर्जमाफी होते. मोठ्या बॅंकेमध्ये त्यांचे कर्ज माफ करण्याकरिता सरकार त्या ठिकाणी मोठी रक्कम देत आहे. त्यातच कोट्याधीश होणारी माणसे आपला पैसा लुबाडून परदेशात पळून जात आहेत व आपले सरकार बघ्याची भूमिका घेतंय. इथे मात्र जो शेतकरी संपूर्ण देशाला अन्न पिकवतो, धान्य पिकवतो, सगळ्यांना जगवतो. अशा या लाखाच्या पोशिंद्यावर हे लाठीचार्ज करतात. या राज्यकर्त्यांना याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.