सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (08:00 IST)

समाजकंटक शेतकऱ्यांच्या जीवावर दुष्काळात काढलेले सोयाबीन जाळून टाकले

लातूर जिल्ह्यावर यंदा पावसाने सूड उगवला आहे. सरकारही लक्ष द्यायला तयार नाही. अशा अवस्थेत कसंबसं पीक काढून शेतकर्‍यांनी रचलेली सोयाबीनची गंजच पेटवून देण्याचा प्रताप पानचिंचोली गावात घडला आहे. पानचिंचोलीत ऋषी होळीकर या तरुण शेतकर्‍याने तीन एकरमध्ये सोयाबीनची लागवड केली होती. फलधारणा होऊन पीक परिपक्व होईपर्यंत त्यांनी प्रतिक्षा केली. पण मळणी यंत्र न मिळाल्याने त्यांनी या सोयाबीनची गंज रचून ठेवली होती. मळणी यंत्र दोन दिवसांनी मिळायचे होते. काल दसरा असल्याने सगळेजण गावात होते. ही संधी साधून अज्ञातांनी ही गंज पेटवून दिली. ही गंज तशीच राहिली असती तर किमान ३० क्विंटल सोयाबीन निघाले असते. त्यातून या शेतकर्‍य़ास एक ते दीड लाख रुपये मिळाले असते. एकीकडून आस्मानी संकट मारते, दुसरीकडून सुलतानी संकट हातात तलवार घेऊन तयारच असते, आता गावातलेच शत्रू आपल्या विकृत समाधानासाठी असे प्रयत्न करीत आहेत. 
 
या प्रकरणी तलाठ्याचा पंचनामा झाला असून आता पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.