शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (09:07 IST)

पीएफच्या व्याजदरात वाढ

provident fund
भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आले. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीपीएफवरील व्याजदर ७.६ टक्के इतका होता. त्यात आता वाढ करण्यात आले. त्यामुळे व्याजदर ८ टक्के इतका झाला आहे.
 
केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी आणि अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ करण्यात आलाय. गेल्या दोन तिमाहीत हे व्याजदर जैसे थे होते. जानेवारी ते मार्च २०१८ या तिमाहीसाठी व्याजदरात कपात करण्यात आली होती. ती पुढे कायम ठेवण्यात आली होती. आता या वाढ करण्यात आल्याने जीपीएफ धारकांना मोठा दिलासा मिळालाय. केंद्रीय वित्त विभागाने आज एक परिपत्रक काढून व्याजदरवाढीची घोषणा केली.