बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (08:55 IST)

अलाहाबाद नव्हे, तर प्रयागराज

अलाहाबाद शहराचे नाव बदलण्याच्या निर्णयाला योगींच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता अलाहाबाद शहर प्रयागराज नावाने ओळखले जाईल. मात्र, 444 वर्षांपूर्वीही या स्थानकाचे नाव प्रयागराज असेच होते. त्यावेळी, अकबर बादशहाने या स्थानकाचे नाव बदलून अलाहाबाद असे ठेवले. त्यानंतर पुन्हा या अलाहाबादचे नाव प्रयागराज बनले आहे.   
 
योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाने अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या शहराला पहिलेच नाव मिळाले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयामुळे संत समाज आनंदी झाला आहे. पण, विरोधकांनी या नाव बदलाला आपला विरोध दर्शवला होता. 
 
इतिहास तज्ञ्ज्ञांच्यामते अकबरनामा, आईने अकबरी आणि अन्य मुगलकालीन इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अकबरने सन 1574च्या जवळपास प्रयागराज येथे किल्ल्याची पायाभरणी केल्याचे म्हटले आहे. अकबरने येथे नवीन नगर बसवले होते. त्याचे नाव अलाहाबाद ठेवण्यात आले.