बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (09:05 IST)

यूट्यूब सेवा पुन्हा सुरु

अर्ध्या तासाच्या खोळब्यानंतर जगभरातील यूट्यूब सेवा पुन्हा सुरु झाली आहे. याआधी यूट्यूब सुरू करताच वापरकर्त्यांना एरर मेसेज दिसत आहे. डेस्कटॉप आणि मोबाईल अशा दोन्ही ठिकाणी यूट्यूब वापरताना अडचणी येत आहेत. अनेकांनी यूट्यूबवर लॉईन करण्याचा, व्हिडीओ अपलोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलेलं नाही. सोशल नेटवर्किग साईट्सवर अनेकांनी त्यांचा याबद्दलचा अनुभव शेअर केला आहे. त्यामुळे ट्विटरवर यूट्यूब डाऊन (#YouTubeDOWN)ट्रेंडमध्ये होते.
 
यूट्यूब सुरू करताच एरर मेसेज दिसत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना व्हिडीओ अपलोड करणं, व्हिडीओ पाहणं शक्य होत नाहीय. यूट्यूब बंदअसल्याच्या तक्रारींनी सोशल मीडियावर पूर आला. फेसबुक, ट्विटरवर अनेकांनी यूट्यूब सुरू करताच दिसणारा एरर मेसेज शेअर केला.